उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी – मायावती

0
64
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही हैदराबाद पोलिसांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे म्हटलं.

दरम्यान ”उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, येथील राज्य सरकार झोपलंय. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांची प्रेरणा घ्यायला हवी” असे मत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here