Wednesday, March 29, 2023

परीक्षेचा यूपी पॅटर्न: मुख्याध्यापकांनी दिले विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचे धडे; व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील एका शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत कॉपी कशी करावी हे सांगताना कॅमेर्‍यावर पकडले गेले आहेत. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. लखनौपासून ३०० कि.मी. अंतरावर माऊ जिल्ह्यात असलेल्या खासगी शाळेचे व्यवस्थापक ताठ सह-प्राचार्य प्रवीण मल यांचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने बनवला आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांचा व्हिडिओ बनविण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक महोदय काही पालकांसमोर विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत कॉपी कशी करावी हे सांगत आहेत. एका विद्यार्थ्याने ही क्लिप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तक्रार पोर्टलवर अपलोड केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

2 मिनिट लांबीच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक सांगतात, ”मी चॅलेंज देतो कि माझा कोणताही विद्यार्थी कधीही नापास होऊच शकत नाही तेव्हा कोणीही घाबरण्याचे काम नाही.तुम्ही आपापसात चर्चा करुन पेपर देऊ शकता. कोणाच्याही हाताला स्पर्श करु नका. तुम्ही एकमेकांशी बोलून पेपर सोडव. घाबरू नका तुमच्या सरकारी शाळा परीक्षा केंद्रांचे शिक्षक माझे मित्र आहेत. जरी तुम्ही पकडला गेलात आणि कोणी तुमच्या कानशिलात एक-दोन लागवल्या तरीही घाबरू नका.”

- Advertisement -

या व्हिडिओत ते पुढे म्हणतात ”कुठलाही प्रश्न सोडू नका. आपल्या उत्तरपत्रिकेत फक्त 100 रुपयांची नोट ठेवा. शिक्षक डोळे मिटून तुम्हाला गुण देतील. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले आणि त्याला जर चार गुण असतील तर तुम्हाला तीन गुण मिळतील. यानंतर मुख्याध्यापक महोदय आपलं विध्यार्थी संबोधन ‘जय हिंद, जय भारत’ अशा घोषणा देऊन संपवतात.

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (यूपी बोर्ड) च्या हायस्कूल आणि इंटरमीडिएटच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. कॉपीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाचा कडक बंदोबस्त पाहून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 2 लाख 39 हजार 133 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं टाळलं. कॉपी रोखण्यासाठी राजधानी लखनौमध्ये यावेळी राज्यस्तरीय देखरेख व नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून या ठिकाणी राज्यभर परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवली जात आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.