ईदला बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी आपल्या मुलांची कुर्बानी द्या! भाजपा आमदाराचं बेताल वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दैनिक लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

“सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. तेदेखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी. निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचं सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावं लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं,” असं नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी नाही-नवाब मलिक
दरम्यान महाराष्ट्रात बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment