मुंबई । सध्या सोशल मीडियावर एका महिला डॉक्टरची (Women Doctor) जोरदार चर्चा होत आहे. तिचा एक फोटा जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एका महिलेले जुळ्या मुलींना रुग्णालयात जन्म दिला. त्यानंतर त्या दोन्ही जुळ्यांच्या आईने त्यांना सोडून (Mother Rejected Her Twins Girls ) दिले आणि ती रुग्णालयातून घरी गेली. या मुलींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न होता. मात्र, या जुळ्या मुलींवर उपचार करणाऱ्या अविवाहित महिला डॉक्टर कोमल यादव यांनी त्यांना आपलेसे केले.
डॉ. कोमल यांना रुग्णालय प्रशासनाने खूप समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आपल्या मतावर ठाम राहिल्या. इतकेच नव्हे तर या दोन मुलींचा स्वीकार करणाऱ्याशीचं आपण लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फर्रुखाबाद येथे डॉ. कोमल यादव या एका रुग्णालयात काम करत आहेत. यावेळी त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांची माता त्यांना टाकून निघून गेली.
जन्म देते ही जुड़वाँ बेटियों को माँ ने ठुकरा दिया तो उसका इलाज करने वाली अविवाहित महिला डॉक्टर डॉ. कोमल यादव ने उन्हें अपना लिया.
डॉ. कोमल यादव वर्तमान में फर्रुखाबाद के एक निजी अस्पताल में तैनात हैं. उनका कहना है कि वो शादी भी उसी से करेंगी जो इन दोनों बच्चियों को अपनाएगा.🙏🙏 pic.twitter.com/WR7nvZDDp4
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) December 31, 2020
त्यानंतर डॉ. कोमल यांनी सर्व औपचारिकता पूर्ण करुन दोन्ही मुलींना दत्तक घेतले. या त्यांच्या कामगिरीमुळे आयएएस अधिकारी अवनिष शरण यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याबाबत ट्विट करत फोटोही शेअर केला आहे. त्यांतर ही पोस्ट अधिक व्हायरल होत आहे. ट्विटवर डॉ. कोमल यांचे कौतुक होत आहे. प्रेरणादायी गोष्टीबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’