Upcoming Marathi Film : चुकून चुका करणाऱ्या ‘चाळिशीत’ल्या चोरांची धम्माल गोष्ट; नव्याकोऱ्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Film) ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ या गाण्यातील हूक स्टेपही सादर केली.

Alibaba Aani Chalishitale Chor Official Trailer | अलीबाबा आणि चाळीशीतले चोर | Subodh, Mukta, Umesh

‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. मात्र ट्रेलर पाहाता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. (Upcoming Marathi Film) आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर आपल्याला २९ मार्चला मिळणार आहे. चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अंर्तमुखही करणार आहे.

Alibaba Aani Chalishitale Chor Official Trailer Launch Event

ट्रेलर, तगडी स्टारकास्ट यावरून हा चित्रपट म्हणजे एक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असणार हे नक्की! (Upcoming Marathi Film) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे निर्माते आहेत.

‘एक्साईटमेंट’ शोधण्याचा खेळ! (Upcoming Marathi Film)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेंव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो. आणि मग सुरू होतो ‘एक्साईटमेंट’ शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे’. (Upcoming Marathi Film)