हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे. त्याच पहिलं पोस्टर आता समोर आलं आहे.
‘झाड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज (Upcoming Marathi Movie)
‘झाड’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये ओसाड जमिनीवर पूर्ण सुकून गेलेल्या झाडाची तोड केलेले दिसत आहे. हे पोस्टर न बोलता बरंच आहि बोलत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या ‘झाड’ या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.
कधी होणार प्रदर्शित?
हा चित्रपट येत्या २१ जून २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. (Upcoming Marathi Movie) या आगामी चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे.
पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणार
झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. (Upcoming Marathi Movie) त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी ‘झाड’ या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.