डिसेंबर महिना ठरणार खरेदीदारांसाठी खास ; बजेटमध्ये बाजारात अनेक स्मार्टफोनची एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहकांना डिसेंबर महिना स्मार्टफोन खरेदीदारांसाठी आनंदाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक दमदार बजेट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. तसेच काही स्मार्टफोन्सच्या लाँचच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत, तर काहींच्या तारखा येणे बाकी आहे . बाजारात iQOO 13 आणि Redmi Note 14 सीरीज यासारखे अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्स लवकरच दाखल होणार आहेत. तर चला या सर्व स्मार्टफोनबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

3 डिसेंबरला भारतात iQOO 13 उपलब्ध

iQOO 13 आधीच चिनी बाजारात Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लाँच झाला आहे. भारतात हा फोन 3 डिसेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 16GB रॅम आणि 6000mAh क्षमतेची बॅटरी 120W चार्जिंग सपोर्टसह मिळेल. 6.82 इंच AMOLED डिस्प्ले आणि 32MP सेल्फी कॅमेरादेखील यामध्ये आहे.

9 डिसेंबरला Redmi Note 14 सीरीज लाँच

Redmi Note 14 सीरीज भारतात 9 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro Plus यांचा समावेश असेल. कंपनीने याची घोषणा केली आहे .

Realme 14x स्मार्टफोन

Realme आपला नवीन स्मार्टफोन Realme 14x लाँच करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर महिन्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासेटअप मिळू शकतो. कंपनी लवकरच याबाबत अधिक माहिती जाहीर करणार आहे.

Vivo X200 सीरीज

Vivo X200 सीरीज ऑक्टोबरमध्ये चिनी बाजारात लाँच झाली असून तो आता भारतीय बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहे. या सीरीजमध्ये Vivo X200 आणि X200 Pro हे दोन मॉडेल्स असतील. बेस मॉडेलमध्ये 5800mAh बॅटरीसह 120W चार्जिंग सपोर्ट मिळेल, तर प्रो मॉडेलमध्ये 6000mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट असणार आहे.

Realme Narzo 70 Curve

Realme आपली Narzo सीरीज विस्तारत केली आहे. Narzo 70 Curve हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच होणार आहे. याबाबत सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र कंपनी लवकरच या फोनची घोषणा करेल. डिसेंबर महिन्यात लाँच होणारे हे स्मार्टफोन्स वेगवेगळ्या किंमतीत आणि वैशिष्ट्यांसोबत येणार आहेत. तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यामुळे तुम्हाला चांगला फोन मिळेल.