UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय पैसे काढता येणार; कसे? लगेच जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (UPI ATM) पाकिटात कॅश नसेल तर आपले पाय आपोआपच ATMकडे वळतात. मग काय, ATM कार्डचा वापर करायचा आणि काही सेकंदातच कॅश काढायची. इतकं सोप्प आहे. पण ज्या दिवशी आपण ATM कार्ड घरातच विसरून जातो, तेव्हा मात्र मोठी पंचायत होते. तुमच्या बाबतीतही असं झालंय का? तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं ATM कार्ड बिंदास्त घरात ठेवून जा. कारण, आता ATM कार्डाशिवाय अगदी सोप्या कॅश काढता येते. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय शक्य आहे? तर हे शक्य आहे आणि याविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.

डेबिट कार्डशिवाय काढा ATM मधून कॅश

आजकाल विज्ञान इतकं प्रगत झालंय की, रोबोट घरातली काम करताना दिसतात. (UPI ATM) मग डेबिट कार्डाशिवाय ATM मशिनमधून पैसै काढणं काय कठीण आहे? होय. आता डेबिट कार्डशिवाय ATM मशिनमधून अगदी सहज पैसे काढता येतात. कारण देशभरात यूपीआय ATM ची सुरुवात झाली आहे. या ATM मध्ये तुम्ही यूपीआय क्यूआर कोड आपल्या मोबाईलवरुन स्कॅन करुन काही सेकंदात पैसै काढू शकता.

भारतातील पहिले UPI ATM

युपीआय ATM हे तंत्रज्ञान नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. हिताची लिमिटेडची सहाय्यक कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेस यांनी भारतात हे तंत्रज्ञान यशस्वीरीत्या लॉंच केले आहे. (UPI ATM) त्यामुळे आता भारतात पहिले यूपीआय एटीएम सुरु झाले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने युपीआय ATM चे व्हाइट लेबल एटीएम आता भारतीयांच्या सेवेत आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही यूपीआय अॅपच्या विविध अकाऊंट्समधून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने डेबिट कार्डशिवाय पैसे काढू शकता.

असे वापरा युपीआय ATM

आजकाल प्रत्येकजण युपीआय पेमेंटचा वापर करताना दिसतो. त्यामुळे युपीआय ATM चा वापर करणे कठीण नसल्याचे समोर आले आहे. यूपीआय ATM वापरकर्त्यांना १००, ५००, १०००, २००० ते ५००० रुपये असे पर्याय उपलब्ध असतील. तसेच इतर रक्कमेसाठी मात्र तुम्हाला ATM मशीनच्या स्क्रिनवरील बटणांचा वापर करावा लागेल. यानंतर स्क्रीनवर दिसणारा यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही कॅश काढू शकणार आहात.

युपीआय ATM चा फायदा

युपीआय ATM विविध प्रकारे फायदेशीर ठरणार आहे. (UPI ATM) मुख्य म्हणजे, यूपीआय पेमेंट नॉन बॅंकिंग संस्थांकडून चालवले जाणार आहे. ज्यामुळे बॅंकींग इन्फ्रास्ट्रक्चर आणि पैसे काढण्याची लिमिट वाढेल. इतकेच नव्हे तर अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी स्क्रीनवर येणार स्कॅन कोड अकाउंट वापरकर्त्याकडून स्कॅन होत नाही तोपर्यंत कॅश बाहेर येत नाही. यामुळे आर्थिक गुन्हेगारी आणि फ्रॉड केसेसवर रोख लावण्यासाठी मोठी मदत होणार आहे.