UPI New Scam | सध्या संपूर्ण भारत डिजिटल झालेला आहे. सगळे आर्थिक व्यवहार देखील आता डिजिटल पद्धतीने चालू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी पाहिलेले होते. आणि तेच स्वप्न आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. 2016 पासून भारतामध्ये UPI सेवा सुरू झाली, हा पेमेंट करण्याचा एक अत्यंत सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. अनेक लोक UPI च्या माध्यमातूनच पेमेंट करत असतात. कॅश किंवा कार्ड पेमेंट करण्यापेक्षा अनेक लोक UPI ने पेमेंट करण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण याने पेमेंट अगदी जलद गतीने होते. आणि यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क देखील घ्यावी लागत नाही.
परंतु सध्या UPI च्या (UPI New Scam) वाढत्या पेमेंटमुळे फसवणुकीच्या घटकांमध्ये देखील वाढ झालेली दिसत आहे. फसवणूक करणारे लोक नवनवीन मार्ग शोधत आहेत. आणि सर्वसामान्य लोकांच्या पैशाची फसवणूक करत आहेत. तसेच ओटीपीच्या माध्यमातून देखील अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक बळी पडतात आणि त्यांच्या अकाउंटमधील पैसे जातात. पण हा यूपीआय ऑटो पे स्कॅम काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत
UPI ऑटो पे स्कॅम | UPI New Scam
UPI द्वारे यूजरची (UPI New Scam)ऑटो पे द्वारे फसवणूक केली जाते. म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्स किंवा डिस्नी साठी जर रिक्वेस्ट पाठवली असेल, तर लोक त्याचा फायदा घेतात आणि तुम्हाला विनंती करतात. यावेळी युजर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतात. परंतु आपल्याला असे वाटते की ती रिक्वेस्ट त्या कंपनीकडूनच आलेली आहे. आणि आपण ती स्वीकारतो आणि आपल्या खात्यातून पैसे जातात. परंतु हे पैसे आपल्या कोणत्या सबस्क्रिप्शनसाठी न जाता ही फसवणूकदारांच्या बँक खात्यात गेलेले असतात. भारतात या खोट्या फसवणुकीला अनेक लोक बळी पडलेले आहेत. परंतु यापासून आपण स्वतःला वाचवणे आणि आपले पैसे सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे.
आजकाल लोक शॉपिंग, रेस्टॉरंट, मॉल, पार्किंग इत्यादी ठिकाणी आपला नंबर देतात किंवा आपल्या यूपीआय आयडीवरून पेमेंट करतात. त्यामुळे लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि आपला UPI आयडी त्यांना समजतो. आणि ते फसवणूक करतात. तुम्हाला जर यासारख्या फसवणुकीपासून रक्षण करायचे असेल, तर तुमचा यूपीआय आयडी तुमच्या बँक खात्याशी संलग्न करू नका. त्याऐवजी तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कॅशद्वारे जास्तीत जास्त पेमेंट करत जा. त्यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे देखील सुरक्षित राहतात आणि तुमचे काम देखील होते. तसेच कोणतीही ऑटो पे रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नक्की कोणती रिक्वेस्ट आहे. या गोष्टीची पूर्ण शहानिशा करा आणि नंतरच तुमचे पैसे पाठवा. अन्यथा तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.