UPI Payment | इंटरनेटशिवायही करता येणार UPI द्वारे पेमेंट; हे फिचर होणार लॉन्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPI Payment | संपूर्ण भारताचा डिजिटल क्रांती झालेली आहे आणि या डिजिटल क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळेच आपण एका जागेवर बसून मोबाईल द्वारे कोणालाही पैसे पाठवू शकतो. तसेच पैसे मिळवू देखील शकतो. यात यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करत असतात. तसेच अगदी सहज आणि काही सेकंदातच तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतात.

या यूपीआय पेमेंट ॲपमुळे आजकाल कॅशलेस व्यवहार व्हायला लागलेले आहेत. अगदी कमी वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने आपण आर्थिक व्यवहार करू शकतो. यूपीआय पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने देखील अनेक पावले उचललेली आहे. भारतासोबतच मालदीव, श्रीलंका इतर अनेक देशांमध्ये युपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. अशातच आता या यूपीआय पेमेंट संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत.

इंटरनेटशिवाय व्यवहार करता येतात | UPI Payment

तुम्ही आता इंटरनेट शिवाय देखील यूपीआय पेमेंट करू शकता. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यूपीआय 123 पे द्वारे फीचर फोन आणि स्मार्टफोन युजरसाठी एक डिजिटल पेमेंट अधिक सोपे केलेले आहे. आता तुम्ही इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट द्वारे दहा हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.

‘या’ पद्धतीने इंटरनेट शिवाय होते पेमेंट | UPI Payment

इंटर ऍक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स

तुम्ही इंटरनेटिव्ह वाईज रिस्पॉन्सच्या मदतीने व्हॉइस पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ठराविक आयव्हीआर नंबरवर कॉल करावा लागेल. आणि त्या नंतर तुम्ही तुमच्या कीपॅड मधून योग्य पर्याय निवडून पेमेंट करू शकता.

प्रॉक्सिमिटी साउंड बेस पेमेंट

या अंतर्गत तुम्ही तुमच्या फोनच्या जवळच्या डिवाइस वरून येणाऱ्या स्पेशल टोन द्वारे पेमेंट करू शकता. या डिवाइसवर तुम्हाला तुमचा फोन टॅप करून पैसे देता येतात.

मिस कॉल

आता युजर मिस कॉलच्या माध्यमातून देखील पैसे टाकू शकतात
यासाठी तुम्हाला एक नंबरवर कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला कॉल येईल आणि कॉलमध्ये तुम्ही तुमचा यूपीआय पिन टाकून ट्रांजेक्शन करू शकता.

फोन द्वारे पेमेंट |UPI Payment

सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या फोन द्वारे ॲप द्वारे यूपीआय पेमेंट करू शकता. तुम्ही इंटरनेट शिवाय देखील हे पेमेंट करू शकता.