UPI Rule Change | UPI द्वारे पेमेंट करण्याच्या नियमात बदल ; 1 नोव्हेंबरपासून मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPI Rule Change | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न आता साकारताना दिसत आहे. अनेक आर्थिक व्यवहार देखील आता डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहे. यामध्ये UPI मार्फत ऑनलाइन पेमेंट करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. यूपीआयच्या मदतीने लोक अगदी काही क्षणार्धात कोणालाही पैसे पाठवू शकतात. तसेच कोणाकडून पैसे घेऊ देखील शकतात. ही आर्थिक क्षेत्रातील एक खूप मोठी डिजिटल क्रांती मानली जाते. कारण यामुळे आर्थिक व्यवहार करणे अगदी सहज आणि सोपे झालेले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना रोख रक्कम सोबत घेण्याची गरज देखील पडत नाही. त्यामुळे चोरी होण्याची किंवा इतर कुठल्या गोष्टीचा धोकाही कमी असतो.

परंतु आता या यूपीआय (UPI Rule Change) पेमेंटचा वापर करून पेमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये 1 नोव्हेंबर पासून काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आता लहान डिजिटल पेमेंट सोप्या पद्धतीने करण्यासाठी ऑटो टॉप अप वैशिष्ट्य लॉन्च केलेले आहे. आणि यामध्ये व्यवहाराची मर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे.

नवीन नियमानुसार आता युजर्स त्यांचा यूपीआय पिन न टाकता 1000 रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 500 रुपयांपर्यंत होती. परंतु आता तुम्हाला पिन न टाकता 1 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. वॉलेटमध्ये शिल्लक ठेवण्याची कमाल रक्कम ही आता 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये करण्यात आलेली आहे. तसेच दैनंदिन व्यवहाराची मर्यादा ही केवळ 4 हजार रुपये असणार आहे.

ऑटो टॉप अप वैशिष्ट्य काय आहे ? | UPI Rule Change

ज्यावेळी शिल्लक मर्यादेपेक्षा निर्दिष्ट कमी होते. त्यावेळी ऑटो टॉप वैशिष्ट्य युजरचे यूपीआय लाईट खाते स्वयंचलितपणे रिचार्ज करते. त्यावेळी युजर आपले यूपीआय द्वारे ऑटो टॉपअप रक्कम सेट करू शकतात. हे ऑटो टॉप अप वैशिष्ट्य वापरण्यासाठी युजर्सला त्यांच्या यूपीआय ऍपद्वारे ते सेट करणे गरजेचे आहे. जे त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या यूपीआय लाईट वॉलेट मध्ये स्वयंचलितपणे पैसे हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देतात तसेच युजर्स ते कधीही रद्द देखील करू शकतात.