UPSC 2023 Final Result: UPSC परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर!! देशात आदित्य श्रीवास्तवचा पहिला क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC 2023 Final Result| लाखो उमेदवारांचे लक्ष लागून असलेल्या UPSC परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC परीक्षेत आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) याचा प्रथम क्रमांक आला आहे. तसेच, या परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान याचा दुसरा क्रमांक, दोनुरु अनन्या रेड्डी हीचा तिसरा क्रमांक आला आहे. यांच्यासह पीके सिद्धार्थ रामकुमारने चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्यामुळे देशभरातून या पाचही जणांचे कौतुक करण्यात येत आहे.

आज जाहीर झालेला यूपीएससीचा रिझल्ट upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येत आहे. गेल्या 2023 साली 1143 जागांसाठी UPSC च्या परीक्षा पार पडल्या होत्या. याचं परीक्षेचा निकाल (UPSC 2023 Final Result) 16 एप्रिल रोजी म्हणजेच आज जाहीर करण्यात आला आहे. यूपीसीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत 1016 उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. यातील पहिल्या क्रमांकावर आदित्य श्रीवास्तव याने स्थान मिळविले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांक अनिमेष प्रधान याचा आला आहे.

दरम्यान, 2023 साली राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून 1043 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. (UPSC 2023 Final Result) या रिक्त जागा अंतर्गत 180 आयएएस, 200 आयपीएस आणि 36 आयएफएस ही पदे होती. यात 1043 पैकी 1016 स्पर्धकांची शिफारस केली गेली होती. ज्यात 347 जनरल कॅटेगरी, 115 ईबीएस, 303 ओबीसी, 164 एससी, 86 एसटी प्रवर्गातील स्पर्धक आहेत. निकालात 355 उमेदवारांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.