दिल्ली | केंद्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कनिष्क कटारिया याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. अक्षत जैन याने दुसरा तर जुनैद अहमद या परीक्षेत देशातून तिसरा आला आहे.
महाराष्ट्राची सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी तर मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. महाराष्ट्राच्या मुलीने देशात पहिला क्रमांक मिळवण्याची आतापर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून महाराष्ट्राच्या तमाम लोकांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं बोललं जात आहे.
पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे. ग्रुप ए मधून 384, ग्रुप बीमधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
इतर महत्वाचे –
भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख
भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
भाग 3 – स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट
भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???
भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???
भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण
भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018