Mahindra Thar वर मिळवा 40,000 पर्यंतची सूट, ‘या’ वाहनांवरही सवलत उपलब्ध

Mahindra Thar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahindra Thar : सध्या भारतीय बाजार पेठेत अनेक नवनवीन गाड्या दाखल होत आहेत. अशातच कार निर्मात्या कंपन्यांकडूनही आपल्या कारसाठी अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटही दिले जात आहेत. आता महिंद्राकडून थार एसयूव्ही या आपल्या कारवर मोठी सवलत दिली जात आहे. हे लक्षात घ्या कि, कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये या कारचा समावेश होतो. ग्राहकांना थार 4X4 च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळू शकेल. हा डिस्काउंट SUV AX (O) आणि LX या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. Mahindra Thar

Mahindra Thar Price - Images, Colours & Reviews - CarWale

महिंद्राच्या या थार एसयूव्हीमध्ये तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. यामधील पहिल्या पर्यायामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि रिअर व्हील ड्राइव्ह सिस्टीम आणि RWD सहीत 1.5L चे डिझेल इंजिन उपलब्ध आहे. यामधील दुसऱ्या पर्यायामध्ये 2.2L डिझेल इंजिन 4 व्हील ड्राइव्ह सिस्टीम आणि मॅन्युअल/ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 2.0L पेट्रोल इंजिन रिअर व्हील ड्राइव्ह सिस्टीम उपलब्ध आहे. Mahindra Thar

All-new Mahindra Thar first drive review - Introduction | Autocar India

तसेच या कारचे 1.5L चे डिझेल इंजिन 300Nm/ 118bhp तर 2.2L चे डिझेल इंजिन 300Nm/ 130bhp चा टॉर्क जनरेट करतील. तसेच पेट्रोल इंजिन 300Nm/ 152bhp चा टॉर्क जनरेट करते. या थार 4X4 मध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल मिळेल. याद्वारे कमी ट्रॅक्शन असलेल्या रस्त्यावरही कारला मजबूत पकड मिळू शकेल. Mahindra Thar

New Mahindra Thar booking figure crosses 9,000-mark in 5 days | Autocar  India

लवकरच लाँच होणार नवीन व्हेरिएंट

कंपनीकडून आता लवकरच या कारचे एक नवीन एंट्री-लेव्हल 4X4 व्हेरिएंट लाँच केले जाणार आहे. तसेच यामध्ये 2.0L चे पेट्रोल किंवा 2.2Lचे डिझेल इंजिन दिले जाऊ शकेल. Mahindra Thar

Mahindra's 5-door Thar to debut in India between 2023-2026

5 दरवाजे असलेली महिंद्रा थारची चाचणी

हे लक्षात घ्या कि, आता महिंद्राडन 5-दरवाजे असलेल्या थारची चाचणी देखील केली जाते आहे. तसेच ही नवीन कार 2023 किंवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, यामध्ये अपडेटेड इन्फोटेनमेंट सीसीट्म, सनग्लास होल्डर आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्ट दिले जाऊ शकतील. सध्याच्या थारपेक्षा ही कार 300 मिमी लांब व्हीलबेससहीत येईल. याशिवाय याचे बॉडी पॅनेल्सही नवीन असतील. तसेच यामध्ये जास्त केबिन स्पेस देखील मिळेल. बाजारात ही कार मारुती सुझुकीच्या जिमनीला टक्कर देईल. जी कंपनी कडून पुढील महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. Mahindra Thar

महिंद्राच्या या कारवरही मिळेल सवलत

थार व्यतिरिक्त महिंद्राच्या इतर वाहनांवरही सूट दिली जाते आहे. आता Mahindra Marazzo वर 72,000 रुपयांपर्यंतची सूट तर महिंद्रा बोलेरोवर 66,000 रुपयांपर्यंतची सूट आणि XUV300 वर 52,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. त्याच प्रमाणे बोलेरो निओवर देखील 48,000 रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://auto.mahindra.com/suv/thar

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…