अभिनंदन! ‘लोकशाही’ वाचली, पण अध्यक्ष महोदय..; उर्मिला मातोंडकरांचा फडणवीसांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर टीका करताना सत्यमेव जयते अस म्हंटल होत. त्यानंतर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यानी फडणवीसांवर पलटवार केला आहे.अभिनंदन! ‘लोकशाही’ वाचली, पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा असे त्यांनी म्हंटल.

यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. “अभिनंदन!आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असे ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले-
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही वाचविणारा आहे. हा ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मविआ सरकारच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली आहे.

Leave a Comment