Thursday, March 30, 2023

अभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला डेट…

- Advertisement -

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा अफेअर्समुळे जास्त चर्चेत असते आणि यातही खास गोष्ट अशी की तिचं नाव आतापर्यंत अभिनेत्यांशी नाही तर वेगवेगळ्या क्रिकेटर्सशी जोडलं गेलं आहे. काही काळापूर्वी तिचं नाव भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांची बरीच चर्चाही झाली. मात्र त्यानंतर आता तिचं नाव आणखी एका क्रिकेटरशी जोडलं जात आहे. हा क्रिकेटर आहे वृषभ पंत असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उर्वशीला रात्री उशीरा वृषभ पंतसोबत स्पॉट केलं गेलं.

 

- Advertisement -

 

क्रिकेटर वृषभ पंतसोबत उर्वशीच नाव जोडलं जाणं हे चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही. कारण याआधी हे दोघं एकत्र कधीच दिसले नव्हते. ‘स्पॉटबॉय-ई’नं दिलेल्या वृत्तानुसार वृषभ पंत आणि उर्वशी 10 डिसेंबरला रात्री 11च्या सुमारास डेटवर गेलेले दिसले होते. या दोघांना जुहूच्या ईस्टेला हॉटेल डिनर करताना स्पॉट केलं गेलं आणि विशेष म्हणजे ही डिनर डेट T20 मॅचच्या 1 दिवस अगोदर झाली. त्यामुळे आता ही डेट दुसऱ्या तिसऱ्या डेटमध्ये बदलते की ही सुद्धा फक्त अफवा ठरते. याची सर्वांना उत्सुकता आहे.

 

 

वृषभ पंतच्या आधी उर्वशीचं नाव क्रिकेटर हार्दिक पांड्याशी जोडलं गेलं होतं. काही मीडिया रिपोर्टनुसार उर्वशी आणि हार्दिक एका पार्टीमध्ये भेटले होते आणि त्यानंतर या दोघांना अनेकदा डेटवर स्पॉट केलं गेलं. पण जसं या दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या तसं या सर्व अफवा असल्याचं सांगत उर्वशीनं या चर्चांना लगाम लावला. त्यानंतर हार्दिक सुद्धा उर्वशी नाही नताशा स्तांकोविकशी रिलेशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.