संयुक्त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी कोरोनाव्हायरसने संक्रमित,तर तीन जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संयुक्त राष्ट्रसंघही सुटू शकलेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत, कोविड -१९ च्या संक्रमणाने संयुक्‍त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी बाधीत झाले आणि संपूर्ण यूएन सिस्टममध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले, “साथीला सुरूवात झाल्यापासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत संयुक्त राष्ट्रातील सिस्टममध्ये कोविड -१९च्या संसर्गाची लागण आतापर्यंत १८९ जणांना झाली आहे त्याशिवाय तिघांचा मृत्यू देखील झालेला आहे. “

न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात कोविड -१९चा प्रसार कमी करण्यासाठी १३ मार्च रोजी, यूएन चीफ यांनी सर्व कर्मचार्‍यांना १६ मार्च ते १२ एप्रिल पर्यंत वर्क फ्रॉम होम आणि दुरूनच काम करण्याचे निर्देश दिले.यानंतर १ एप्रिल रोजी त्यांनी टेलीकम्यूटिंग (इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने कोठूनही बसून) बसविण्याचा आदेश ३० एप्रिलपर्यंत वाढविला.

अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अंदाजानुसार जगभरात कोरोना विषाणूची १.२ लाख प्रकरणे आहेत आणि १,१९,६८७ लोकांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत अमेरिकेत जगात सर्वाधिक ५,८२,६०७ संक्रमित लोक आहेत. तेथे कोविड -१९ मुळे सुमारे २३,००० लोक मरण पावले आहेत.

महासचिव उपप्रवक्ता फरहान हक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “रविवारी सायंकाळपर्यंत जगभरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या १८९ जणांच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे आणि जागतिक महामारी सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेतले तीन लोक मृत्यूमुखी पडले आहेत.” प्रवक्त्यांनी देशांनुसार या प्रकरणांचा तपशील दिलेला नाही आहे.

United Nations and its Organs - Important International ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment