वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प हे अयोग्य राष्ट्राध्यक्ष असून आगामी निवडणूक सर्वांच्या जीवनमरणाचा प्रश्न असून जो बिडेन यांना मत देण्याचं आवाहन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी केलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी डेमोक्रेटिक पार्टीकडून जो बिडेन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी युएस डेमोक्रेटिक नॅशनल कन्व्हेंशनची सुरूवात झाली. या कन्व्हेंशनमध्ये जनतेला संबोधित करताना मिशेल ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला.
“डोनाल्ड ट्रम्प अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सहानुभूतीची भावना नाही, जेव्हा आम्ही नेतृत्व किंवा स्थिरतेच्या आशेतून व्हाईट हाऊसकडे पाहतो तेव्हा आम्हाला विभाजन, आराजकता आणि सहानुभूतीची कमतरता जाणवते, खरं सांगायचं झालं तर ट्रम्प हे देशासाठी अयोग्य राष्ट्राध्यक्ष आहेत ” अशा परखड शब्दांत मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
“जर तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती भीषण होणार नाही. आगामी निवडणुकीत बदल घडवला नाही तर परिस्थिती नक्कीच भीषण होईल. जर आपल्याला हा अनागोंदी कारभार संपवायचा असेल तर आपल्या सर्वांना जो बिडेन यांना मतदान करावं लागेल. आपलं सर्वांचं आयुष्य त्यावरच अवलंबून आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”