Wednesday, June 7, 2023

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण; पत्नी मेलानियादेखील कोरोनाबाधित

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कोरोनाची लागण झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.

ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.