चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला झटका; टिकटॉकवर बंदी घालणाच्या आदेशावर केली स्वाक्षरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

याशिवाय अमेरिकेकडून टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील आता निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन त्यांच्यात सीमावादादरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यांतील संघर्षात भारतचे २० जवान शहिद झाले होते. यांनतर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह अन्य काही चीनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अन्य देशांमधूनही अशी मागणी पुढे येत होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment