डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यास भारतीयांना बसू शकतो मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. ज्याचा फाटक भारतीयांना बसू शकतो. अमेरिकेतला H1B आणि रोजगार देणारे इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. अमेरिकेतली वाढती बेरोजगारी बघता ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, असं वृत्त तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आलं आहे. अमेरिकेनं H1B व्हिसा रद्द केल्यास याचा थेट फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना असणार आहे. भारतातले बरेच नागरिक अमेरिकेत रोजगारासाठी H1B व्हिसावर जातात.

अमेरिकेतल्या स्थानिक वृत्तांनुसार ट्रम्प सरकार पुढच्या आर्थिक वर्षात व्हिसा निलंबनाला मंजुरी देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतं. याचवेळी अनेक नवे व्हिसा दिले जातात. प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिल्याचं वृत्तपत्राचं म्हणणं आहे. ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला तर H1B व्हिसा निलंबन संपत नाही तोपर्यंत कोणताही बाहेरचा नागरिक अमेरिकेत नोकरी करू शकणार नाही. दरम्यान, ज्यांच्याकडे आधीपासूनच H1B व्हिसा आहे, त्यांना या निर्णयामुळे चिंता करण्याची गरज नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

H1B हा नॉन-इमिग्रेशन व्हिसा आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांना परदेशी नागरिकांना नोकरी देण्याची सुविधा हा व्हिसा देतो. अमेरिकेतल्या आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी भारत आणि चीनवर अवलंबून असते. त्यामुळे अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भारतीयांवर होऊ शकतो. अमेरिकेत आधीच H1B व्हिसा धारकांना नोकरी गमवावी लागली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांना भारतात परतावं लागत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment