भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

येत्या २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ट्रम्प भारतात येण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मागच्यावर्षी भारताने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण दिले होते. पण त्यावेळी त्यांना शक्य झाले नाही. याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी साबरमती रिव्हरफ्रंटला भेट दिली आहे.

दरम्यान, “संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले. जपान आणि इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा साबरमती रिव्हरफ्रंटवर आले होते. त्यांना सुद्धा नदीची स्वच्छता पाहून आश्चर्य वाटले” असे रुपानी म्हणाले. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येतील. तेव्हा, ते सुद्धा रिव्हरफ्रंटला भेट देतील”. ट्रम्प नेमके कधी भारतात येणार ते रुपानी यांनी स्पष्ट केलेले नाही.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

सनी लिओनीने घेतला कठोर निर्णय; ‘या’ भयानक आजाराच्या भीतीनं चाहत्यांना ‘सेल्फी’ देणार नाही