गांधींच्या साबरमतीमध्ये ट्रम्प यांनी चालवला चरखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे ट्रम्प आल्यानंतर मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचं स्थान असलेल्या साबरमती येथील आश्रमात जात ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया यांच्यासोबत चरखाही चालवला. आश्रमातील महिलेने यासंदर्भातील सूचना ट्रम्प यांना दिल्या.

यानंतर व्हिजिटर्स बुकमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं नाव लिहिलं आणि अभिप्रायही जोडला. मला येथे आमंत्रित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं आभार असं त्यांनी यामध्ये लिहिलं. यानंतर नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना गांधीजींच्या तीन माकडांविषयी माहिती दिली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment