अखेर अमेरिका-तालिबान यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि तालिबान यांच्यात आज ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कतारमधील दोहा येथे एका समारंभात हा शांतता करार पूर्णत्वास आला आहे. दोहामध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात करारावर स्वाक्षरी झाल्यानं, यामुळं १८ वर्षांनंतर अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ या शांतता करारावर स्वाक्षरी समारंभावेळी म्हणाले,” अमेरिका आणि तालिबानमध्ये शांततेचा हा प्रयत्न तेव्हाच यशस्वी झाला जेव्हा तालिबाने अल कायदा व इतर परदेशी दहशतवादी गटांशी आपले संबंध संपवण्यास रस दाखविला. आज आपण ज्या करारावर स्वाक्षरी करणार आहोत ती प्रयत्नांची खरी कसोटी आहे.”

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.