हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व जगभरात अगोदरच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भीतीचे वातावरण आहे. अशात अमेरिकेत कोरोनाबरोबरच अजून एक संकट वाढले आहे. अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे होत असून बर्फवृष्टीमुळे तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेतल्या विविध राज्यांत 7 लाख नागरिक बेघर झाले आहे. तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत घसरला असल्यामुळे न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विमानसेवा ठप्प पडल्याने हजारो नागरिक विमानतळावर अडकले आहेत.
अमेरिकेत वाढत्या थंडीमुळे येथील नागरिकांची हाडे गोठली आहेत. अमेरिकेत अद्याप वादळ असूनही ईशान्येकडील भागांमध्ये जोरदार बर्फ व हिमवादळाच्या परिस्थिती आहे. वारे 65 मैल प्रतितास वेगाने वाहत असल्याने आणि तापमान शून्यापेक्षा कमी झाल्यामुळे शनिवारी जास्त घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या हिमवादळाचा तडाखा जनावरांनाही बसला आहे.
आर्क्टिक प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्ध्या अमेरिकेला बर्फाने वेढले गेले आहे. त्याचा परिणाम प्राण्यांवरही होत आहे. मोंटानामध्ये जनावरं थंडीपासून बचाव करण्यासाठी बर्फातून सैरावैरा पळताना दिसत आहेत. जनावरांचे गोठे, गवत पूर्णपणे बर्फाने आच्छादली गेली आहेत. ख्रिसमसच्या उत्सावाला या बर्फवृष्टीने ब्रेक लावला आहे. या महाभयानक बर्फवृष्टीमुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.