सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज शहरात दहशत माजविणे, सावकारी करणे तसेच साकारीच्या त्रासाला कंटाळून मोहसीन बागवान यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. सावकारी करणाऱ्या पठाण गॅगवर मोका लावावा. जेणे करून समाजामध्ये सावकारी व दहशत माजविणाऱ्यांनवर पोलिसांचे वचक बसेल अशी मागणी माजी महापौर इद्रीस नायकवडी यांनी केली आहे.
यावेळी बोलताना इद्रीस नायकवडी म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात हळूहळू आपले पाय रोवण्याचा प्रयत्न साजीद पठाण व त्याच्या साथीदारांनी केलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणजे ‘ मोहसीन बागवान आत्महत्या प्रकरण ‘ आहे. खंडणी, मारामरी, खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलींग व व्याजबट्टा अशा अनेक कृत्यात त्यांचा सहभाग आहे. ज्या ज्या वेळेस अशी गुन्हेगारी कृत्य करीत असतात व त्यामुळे ज्यांना त्रास होतो ते लोक पोलिसांना तक्रार करणेसाठी जातात परंतू आजपर्यंत तेथे तक्रार नोंदवणेसाठी गेलेल्या तक्रारदारास क्रॉस कपलेंटची भीती दाखवून त्याची तक्रार न नोंदवता त्यास पिटाळून लावले जाण्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. आज मोहसीन बागवान आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य रित्या केली जात आहे.
पहिल्यांदाच पोलिस ठाण्यात अशी व्यापक कारवाई झालेली आहे. हे सर्वजरी असले तरी या गैंगच्या विरोधात हद्दपार, मोका सारखी कारवाई व्हावी. पाठीमागचे प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून पोलिस मुख्यालयात धूळखात पडलेले आहेत. इतक्या गंभीर गुन्हयांची मालीका या गैंग बरोबर जोडली गेलीली असतांना कोणत्या कारणाने हया प्रस्तावावर निर्णय झाला नाही किंवा कारवाई झाली नाही? असा साल त्यांनी यावेळी उपस्थित करत कोणत्या राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार यांचा यात हस्तक्षेप आहे त्यांचा दबाव आहे का? आता अशा बळ देणारे पक्ष किंवा सत्ताधारी यांची माहितीही पोलिसांनी उघड करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या गॅंगवर मोका सारखी कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन रयत्न करणार असल्याचे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांनी सांगितले.