धावपटू उसेन बोल्टला कोरोना ; पार्टीत उपस्थित होता IPL मधील पंजाबचा ‘हा’ क्रिकेटपटू!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला उसेन बोल्ट याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे नुकतीच उसेन बोल्टने त्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीत क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होते.

उसेन बोल्टचा वाढदिवस २१ ऑगस्ट रोजी होता. या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अनेक स्टार खेळाडू आले होते. आता बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या पार्टीत आलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.

बोल्टने आयोजित केलेल्या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता इतकच नव्हे तर कोणी मास्क देखील लावले नव्हते. बोल्टच्या या पार्टीत क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बेली हे देखील उपस्थित होते.विशेष म्हणजे ख्रिस गेल आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो आणि या वर्षी होणाऱ्या युएईमधील स्पर्धेसाठी तो लवकरच संघात दाखल होण्याची शक्यता आहे.

बोल्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो आयसोलेशनमध्ये आहे. पार्टी झाल्यानंतर बोल्टने करोनाची चाचणी घेतली होती. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यात सहभागी झालेले त्याचे मित्र डान्स करत होते आणि एकानेही मास्क लावला नव्हता. पार्टानंतर बोल्टने हॅपी बर्थडे एव्हर असे ट्विट केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’