अंकल लाईन मार रहा है..! मलायकाचे भर रस्त्यात कौतुक करणारे अंकल झाले ट्रोल; नेटकऱ्यांनी केली सीमा पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ‘सुपर डान्सर सीजन ४’ या शोची जज म्हणून दिसतेय. यापूर्वी या शोची जज म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दिसत होती. मात्र तिच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने शोमधून ब्रेक घेतला. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वीच मलायकाने शिल्पाला या शोमध्ये रिप्लेस केले. साहजिकच मलायका याआधी पासूनच चांगलीच चर्चेत आहे. पण यापेक्षाही अधिक सध्या तिच्या एका व्हिडीओवर चित्रविचित्र चर्चा रंगली आहे. एका वृद्ध व्यक्तीने तिला भर रस्त्यात रोखत तिचे कौतुक केल्याचा हा व्हिडीओ आहे. [अन नेटकऱ्यांना तिचे कौतुक काही सहन झाले नाही. त्यांनी मलायकाच्या वयाची खिल्ली उडवलीच पण सोबत त्या वृद्ध व्यक्तीच्या वयाचेही भान ठेवले नाही.

https://www.instagram.com/p/CPK23_OnkMi/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडीओ वूंपलाने पोस्ट केला आहे. यात मलायका नेहमीप्रमाणेच आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघाली असल्याचे दिसतेय. यादरम्यान रस्त्यात तिला एक वृद्ध पुरुष व्यक्ती थांबवतो आणि तिची स्तुती करु लागतो. तू खुप फिट आणि फाईन आहेस. तुझे व्हिडीओ पाहून आम्हालादेखील फिटनेसची प्रेरणा मिळते. अशीच तंदुरुस्त राहा. ईश्वर सदा तुझ्यासोबत आहे. असे म्हणत हि व्यक्ती तिचे कौतुक करून जातो. मलायका देखील अगदी विनम्र होत त्यांचे आभार मानते आणि निरोप घेते. सध्या या व्हिडीओवर नेटकरी अलगच प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी यावरून मलायका आणि सोबतच त्या वृद्ध व्यक्तीस ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.

 

‘अंकल लाईन मार रहा है,’ ‘अंकल के इशारे कुछ ठीक नहीं लग रहें,’ अशा कमेंट करीत काही नेटकऱ्यांनी अक्षरशः लाज सोडली आहे. त्या व्यक्तीचे वय आणि त्याची भावना समजून घेणं सोडाच या नेटकऱ्यांनी तर सोशल मीडिया केवळ ट्रोलिंगसाठी वापरण्याची शपथच घेतली आहे. एका युजरने तर मलायका व त्या वृद्धाची ‘बिछडे हुए क्लासमेट’ असे म्हणत खिल्ली उडवली आहे. मित्र वृद्ध झाला आणि मैत्रीण तरुणच राहिली, असेही एका युजरने लिहिले आहे. या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच हा व्हिडीओ प्रचंड वायरल देखील झाला आहे.

Leave a Comment