पावसाळ्यात कडुलिंबाच्या पानाने तयार केलेल्या फेसपॅकचा ‘असा’ करा उपयोग

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कडुलिंबाच्या पानाचा वापर हा अगदी आयुर्वेदामध्ये केला जात होता. आयुर्वेदापासून या पानांना जास्त महत्व दिले गेले आहे. अंघोळीच्या वेळी सुद्धा लिंबाच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे लिंबाच्या पानाचा वापर केल्याने शरीराचे दुखणे हे पूर्णतः कमी होऊ शकते. कडुलिंबाच्या पानाचा वापर हा फक्त औषधे तयार करण्यासाठी वापरला केला जात नाही . तर त्याचा वापर हा त्वचेच्या रोगासाठी सुद्धा वापर केला जातो. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी सुद्धा कडुलिंबाच्या पानाचा वापर केला जाऊ शकतो.

पावसाळ्याच्या काळात जे अनेक रोगांपासून जर बचाव करायचा असेल तर आपण कडुलिंबाच्या पानाचा वापर केला पाहिजे . घराच्या घरी हा फेसपॅक तयार करू शकतो. पण तो कसा तयार करायचा याची महिती घेऊया.

साहित्य —

दोन चमचे कडुलिंबाच्या पानाची पूड
काही प्रमाणात गुलाबपाणी
एक चमचा लिंबाचा रस

पद्धत —

काही प्रमाणात लिंबाची पाने सुकू द्या त्यानंतर ती बारीक करा. त्यामध्ये गुलाबपाणी टाका. ते टाकल्यानंतर ते मिश्रण एकत्र करा. त्याच्या मध्ये काही प्रमाणात लिंबाच्या रसाचा वापर करा. लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र केलेले मिश्रण ही वेळासाठी चेहऱ्यावर लावा. ते चेहऱ्यावर लावल्यानंतर ते ३० मिनिटे ठेवा थोड्या प्रमाणात ते सुकल्यानंतर थंड पाणी वापरून ते धुवून काढा , यामुळे तुमचा चेहरा अजून तजेलदार वाटायला सुरुवात होते.

फायदे —

लिंबामध्ये आस्ट्रिजन हे गुणधर्म असतात. जे कि चेहऱ्यावरचे तेल काढण्यासाठी मदत करते. तसेच लिंबाची पाने हि आपल्या चेहऱ्यावर अनावश्यक असलेल्या बॅक्टरीया याना नष्ट करण्याचे काम करते. त्यामुळे आपला चेहरा हा अजून तजेलदार दिसायला सुरुवात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’