तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल बघत असाल तर, सावधान ! होऊ शकतो हा गंभीर आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मानवाच्या आयुष्यात खूप जास्त प्रगती झालेली आहे. आधुनिक पद्धतीने आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटते. याबद्दलचे जीवनशैलीमुळे आता मोबाईल, फोन, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी आपल्या जीवनाच्या खूप जवळ आलेले आहे. या तंत्रज्ञानाने आपल्याला संपूर्ण जगाची नव्याने ओळख पटलेली आहे. तसेच आपण जगाशी पटकन जोडले जात आहोत. परंतु या तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होताना दिसत आहेत. मोबाईल फोन वापरण्यात आजकाल काळाची गरज झालेली आहे. अगदी एक मिनिट देखील माणूस स्वतःला मोबाईल पासून लांब ठेवत नाही. अगदी बाथरूममध्ये जरी गेले तरी ते फोन घेऊन जातात. आणि सोशल मीडियावर स्क्रोल करतात. अनेक लोकांना तर टॉयलेटमध्ये बसूनच ऑफिसचे ई-मेल्स वाचण्याची किंवा इतर गोष्टींवर काम करण्याची सवय असते. आणि या कामांमध्ये आपण टॉयलेटमध्ये किती वेळ बसतो? हे आपल्याला समजतच नाही. आणि याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.

टॉयलेटमध्ये आधी फक्त 5 ते 10 मिनिटे लागायची. पण आता 15 ते 20 मिनिट माणूस टॉयलेटमध्ये असतो. परंतु तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिले, तर याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. तुम्हाला मूळव्याध पेल्विक मासपेशीचे नुकसान होते. तसेच पचनाच्या संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हाती आलेल्या माहितीनुसार असे समजले आहे की, तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसला, तर तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचते. या सवयीमुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे स्नायूंचा कमकुवतपणा वाढतो.

तुम्ही जर टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसून राहिला तर गुदद्वारा भोवती तसेच मलाशयामध्ये रक्तवाहिन्यांवर दबावत येतो. जर या भागात सततचा ताण पडला, तर रक्तवाहिन्या देखील सुजतात आणि मुळव्याधाची समस्या निर्माण होते. शरीराच्या खालच्या भागावर अतिरिक्त दाब पडतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला देखील हानी पोहोचते.

तुम्ही जर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसलात, तर मास पेशींवर सततचा तणाव येत राहतो. आणि हळूहळू कमजोर होत जातात. आणि यामुळे पचनप्रक्रिया बाधित होते. आणि मल शरीराबाहेर टाकताना अडचणी होतात. दीर्घकाळ जरी ही समस्या राहिली तर त्याचे एका गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटे घालवावी.

या सगळ्या समस्यांपासून वाचायचे असेल, तर तुम्ही टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय मोडा. तुम्ही पाच ते दहा मिनिटात फक्त टॉयलेटमध्ये वेळ द्या. तुमची पचनक्रिया चांगली होण्यासाठी आहारात ओट्स, बीन्स, फळं आणि भाज्या इत्यादींचा समावेश करा. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसाला कमीत कमी दोन लिटर पाणी प्या. त्याचप्रमाणे शौचाला जाण्यासाठी एक ठराविक वेळ द्या. म्हणजेच तुमची पचनक्रिया सुधारेल.