पाटीलांच्या मिशीचा पिळाच इतका मजबुत की त्यांना काॅलर उडवायची गरज नाही – ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवसेना भाजप महायुतीचे सातारा लोकसभेसाठीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कराड येथे जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी आघाडीचे उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली.

नरेंन्द्र पाटीलांची मिशीच इतकी टाईट आहे की त्यांना काॅलर उडवायची गरजच नाही असं म्हणत ठाकरे यांनी उदयनराजेंचं नाव न त्यांना टोला लगावला. खासदारानं कसं खासदारासारखं वागलं पाहिजे. गाणी मजाक तर कोणीपण करतं अस म्हणत ठाकरे यांनी उदयनराजेंला टोला लगावला.

आज प्रचाराचा शेवटचा टप्पा असून उद्धव ठाकरे यांच्या सभेचा पाटील यांचे मताधिक्य वाढण्यावर मोठा परिणाम पडेल असं बोललं जातय.

Leave a Comment