शिवसेना- आप ची ऑफर का स्वीकारली नाही? उत्पल पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अखेर पणजी मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकर याना भाजपने पणजीतून तिकीट देण्याचे नाकारल्या नंतर त्यांना शिवसेना आणि आम आदमी पक्षाने ऑफर दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसेना आणि आपची ऑफर का नाकारली असा सवाल त्याना केला असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले.

उत्पल पर्रीकर म्हणाले, मी माझ्याच पक्षाच्या दुसऱ्या ऑफर स्वीकारल्या नाहीत, तर इतरांच्या ऑफर काय स्वीकारणार.’ माझ्या वडिलांच्या मूल्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, हे भाजपला पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे संधीसाधू उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान, उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष लढणार असतील तर त्यांच्या उमेदवारी ला पाठिंबा देऊन त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार उभा करू नये असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे पणजी मतदारसंघात नेमकं कोणाकोणात सामना होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment