तुम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देता, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून कोणाला भाजपमध्ये तिकीट मिळत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

उत्पल पर्रीकर म्हणाले की, तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते –

उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. तसेच उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं. असे सूचक विधान फडणवीसांनी केलं होत

नेमकं काय आहे प्रकरण –

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पणजी विधानसभा मतदारसंघ हा मनोहर पर्रिकरांचा पारंपारीक मतदारसंघ होता. पण बाबूश यांनी भाजपच्या बाजूनं सहानुभूती असतानाही निवडणूक जिंकली होती. आताही त्यांनीच पणजीच्या जागेवर दावा केलाय त्यामुळे उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही

Leave a Comment