Thursday, March 30, 2023

सेक्स करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बसेडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पत्नी सेक्सला सतत नकार देत असते या रागातून तिच्या पतीने तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने त्याच्या तीन चिमुरड्यांना नाल्यात फेकत त्यांची हत्या केली आहे.आरोपी पतीचे नाव पप्पू कुमार असे आहे. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
सहा वर्षांपूर्वी पप्पू कुमारचे डॉली नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. त्याला सोनिया, वंश,आणि हर्षिता अशी तिने मुलं होती. मंगळवारी जेव्हा पप्पू कुमार घरी आला तेव्हा त्याने पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवायची मागणी केली. मात्र डॉलीने त्याला नकार दिल्यामुळे त्यांच्या मोठा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात पप्पूने त्याच्याकडील गावठी बंदूकीने डॉलीवर गोळ्या झाडत तिची हत्या केली.

- Advertisement -

यानंतर हा निर्दयी नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने त्याच्या तिन्ही मुलांना नाल्यात फेकून त्याची हत्या केली. त्या मुलांना नाल्यात फेकताना एका गावकऱ्याने पाहिले आणि त्याने आरडाओरड करत गावकऱ्यांना गोळा केले. मात्र तोपर्यंत पप्पू त्या ठिकाणावरून फरार झाला होता. यानंतर गावकरी या प्रकरणाची माहिती डॉलीला देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना डॉलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पप्पूला अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.