उत्तराखंडमध्ये भीषण अपघात ! स्कूल बस पुरात उलटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल मध्यप्रदेशमध्ये एसटी बुडाल्याची (bus washes away in drain) घटना ताजी असताना आज उत्तराखंडमध्ये एक शाळेची बस पाण्यात बुडाली (bus washes away in drain) आहे. ही थरारक घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्याच दरम्यान, उत्तराखंडच्या चंपावत इथे ही बस पुराच्या पाण्यात (bus washes away in drain) अक्षरशः वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कुठे घडली घटना ?
ही घटना उत्तराखंडमधील टनकपूरच्या किरोडा बरसाती नाल्यावर (bus washes away in drain) घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने बसच्या चालकाला आणि त्याच्या मदतनीसाला लोकांनी कसबसं बाहेर काढलं. त्यामुळे सुदैवाने या दोघांचा जीव वाचला आहे. पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आपलं काय घोडचूक केली, याची जाणीव त्यांना झाली. नशीबानं यावेळी बसमध्ये (bus washes away in drain) एकही विद्यार्थी नव्हता. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेची माहिती मिळताच प्रशाकीय यंत्रणेनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने पुराच्या पाण्यात पलटी झालेल्या बसला बाहेर काढण्यात आले.

काल मध्य प्रदेशात भीषण अपघात
काल मध्य प्रदेशात झालेल्या एसटी (bus washes away in drain) अपघातात 13 जण ठार झाले होते. मध्य प्रदेशच्या धारमध्ये इंदौर-अंमळनेर एसटी बस ही पुलावर थेट नदीत कोसळली होती. यामध्ये 13 प्रवासांचा मृत्यू झाला होता. नदीवरुन कोसळून झालेल्या बस अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्ये स्कूल बस पडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

Leave a Comment