काय सांगता ! इथं मोदींच्याच मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाची स्थिती देशात किती बिकट झाली आहे हे मोदी सरकारच्या मंत्र्याच्या उदाहरणावरुन लक्षात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांच्या भावाला बेड मिळत नाहीय. त्यांना बेड मिळण्यासाठी मदत करावी असं आवाहन जनरल व्ही.के.सिंग यांनी ट्विटरवर केलं आहे. गाजियाबादमध्ये त्यांचा भाऊ कोरोनाग्रस्त असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जनरल व्ही.के.सिंग हे मोदी सरकारमधले फक्त मंत्री एवढीच त्यांची ओळख नाही तर ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जर बेड मिळत नसेल तर उत्तर प्रदेशातही कोरोनाची काय स्थिती आहे याचा अंदाज बांधलेलाच बरा.

व्ही के सिंग यांचं ट्विट नेमकं काय?
केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करुन ट्विट केलं आहे. आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना संसर्ग झालेला असून त्याच्या उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही. कृपया तुम्ही लक्ष घाला असं आवाहन व्ही.के. सिंग यांनी केलं आहे.

@dm_ghaziabad
Please check this out
प्लीज़ हमारी हेल्प करे मेरे भाई को कोरोना ईलाज के लिए बेड की आवश्यकता है।अभी गाजियाबाद में बेड की व्यवस्था नहीं हो पा रही है। @shalabhmani @PankajSinghBJP @Gen_VKSingh

— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) April 18, 2021

व्ही. के. सिंग यांनी यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ त्रिपाठी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज सिंह यांना टॅग केलं आहे. उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्र्यांच्या नातेवाईकाला बेड मिळत नसल्याचं या ट्विटमुळं समोर आलं आहे.

Leave a Comment