औरंगाबाद :9 केंद्रांवर आज लसीकरण

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

महापालिकेकडे कोविशिल्डच्या फक्त 1260 लसी उपलब्ध आहेत, आणि लसीचा नवीन साठा न मिळाल्याने आज फक्त पाच केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून लस मिळेल. सादानगर, कैसर कॉलनी, चेतना नगर, शहाबाद, गणेश कॉलनी या आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे.

कोवॅक्सीनचा पहिला आणि दुसरा डोस क्रांती चौक, राजनगर आणि एमआयटी हॉस्पिटल सिडको, एन 4 या केंद्रावर मिळणार असून ड्राईव्ह इन मोहिममध्ये 200 नागरिकांना कोविशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस प्रोझोन मॉल पार्किंग मध्ये देण्यात येणार आहे. पहिला डोस साठी 150 तर दुसरा डोससाठी 50 लसी उपलब्ध आहेत.