देशातील लसीकरणाचा आकडा 90 कोटींच्या पुढे गेला, आरोग्यमंत्र्यांनी केले ट्विट

नवी दिल्ली । कोरोनाविरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणून लसीकडे पाहिले जात आहे. हेच कारण आहे की, कोरोना लस कार्यक्रम थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिपत्याखाली आहे. एकीकडे देशात कोरोनाचे आकडे कमी होत आहेत तर दुसरीकडे लसीकरण एक नवीन विक्रम रचत आहे. भारताच्या लसीकरणाने आता 90 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले,”भारतात लसीकरणाची संख्या 90 कोटींच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे, देशात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली.”

कोरोना लसीकरणाच्या यशाबद्दल माहिती देताना आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत म्हटले आहे की,”भारताने कोरोना लसीकरणात 90 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यांनी लिहिले की, शास्त्रीजींनी ‘जय जवान – जय किसान’ हा नारा दिला होता. आदरणीय अटलजींनी जय विज्ञान जोडले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय अनुसंधानाचा नारा दिला. आज संशोधनाचा परिणाम ही कोरोना लस आहे. #जयअनुसंधान.

भारतात फक्त Covishield, Covaccine आणि Sputnik-V च्या लसींना मान्यता देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 24 हजार 354 नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर या कालावधीत 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोना रूग्ण मिळाल्यानंतर आता देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 3 कोटी 37 लाख 91 हजार 61 वर गेली आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 73 हजार 889 सक्रिय प्रकरणे झाली आहेत, तर 3 कोटी 30 लाख 68 हजार 599 लोकं बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 48 हजार 573 लोकांचा मृत्यू झाला आहे.