आजपासून 30 ते 40 वयोगटाचे लसीकरण सुरु

0
35
corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानुसार पालिकेने शहरातील 115 वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. यातच आता 21 जून पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

यापूर्वी लसीची उपलब्धता विचारात घेऊन राज्य सरकारने शनिवारी दि. 19 पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून मनपाच्या शहरातील दहा केंद्रावर, आणि ग्रामीण भागातील आठ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत 3 लाख 35 हजार 169 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून राज्य सरकारने शनिवारपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महानगर पालिकेने शहरात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी शनिवारपासून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दहा केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. सकाळी दहा ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शुक्रवारी दिनांक 18 रोजी एकूण नवीन 130 रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील 19 रुग्ण, ग्रामीण भागातील 111 रुग्णांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण मधील कोरोना बाधितांची संख्या 100 च्या आत आणण्यास आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या 130 कोरोना बाधित रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 264 झाली असून 203 जणांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये
मनपा 25, ग्रामीण 178 जणांचा समावेश होता. आज पर्यंत 1,40,800 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण तीन हजार 372 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 1092 रुग्णावर उपचार सुरू आहेत.

ही आहेत लसीकरण

ध्रुत हॉस्पिटल, सिल्क मिल्क कॉलनी, विजय नगर आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, सातारा आरोग्य केंद्र, न्यू इंग्लिश स्कूल अयप्पा मंदिर देवळाई आरोग्य केंद्र, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र, ईएसआयसी हॉस्पिटल, नारेगाव आरोग्य केंद्र, छावनी परिषद रुग्णालय, सिडको एन-11 आरोग्य केंद्र या केंद्रावर लसीकरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here