कोरोना संकटात लसीकरण गरजेचे,  नागरिकांनी सहभाग घ्यावा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे विनम्र आवाहन

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध म्हणून लसीला संशोधकांनी मंजुरी दिली आहे.  त्यामुळे निःसंकोचपणे सर्वांनी लसीकरण करावे,  मी स्वतः लस घेतली असून आपण सहभाग नोंदवा,  असे विनम्र आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.

औरंगाबादमधील जिल्हा व्यापारी केंद्राचे बालाजी मंदिर,  राजाबाजार लसीकरण केंद्र,  मनपाचे शाह बाजार लसीकरण केंद्र,  रोटरी क्लब व जैस्वाल महिला संघटनातर्फे कोकणवाडी येथील समाज भवन लसीकरण केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,  माजी महापौर नंदकुमार घोडेले,  व्यापारी महासंघ अध्यक्ष जगन्नाथ काळे,  उपशहरप्रमुख चंद्रकांत इंगळे,  माजी नगरसेवक  प्रफुल मालानी,  लक्ष्मीनारायण राठी,  विजय जैस्वाल,  डॉ. उज्वला भांबरे,  शाखाप्रमुख सचिन गोखले,  संजय नंदाने,  स्वाती जैस्वाल,  रुचिका जैस्वाल,  स्मिता जैस्वाल,  मंगल जैस्वाल,  सुनीता बागला आदींची उपस्थिती होती.

You might also like