कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने 3 हजार 640 बेघर, स्थलांतरित कामगार आहेत. कोरोनाच्या अनुषगांने लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले असून शहरी व ग्रामीण भागासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहीती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
कराड येथील पंचायत समिती येथे प्रशासन व आरोग्य विभागाकडून शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनिल कोरबू, ब्लाॅक नर्सिग अधिकारी अनिता कदम, अरूण काळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अमरदीप वाकडे म्हणाले, ज्या लोकांच्याकडे कोणताही पुरावा नाही, वंचित घटक असलेल्या लोकांनी या पथकाच्या माध्यमातून लस घ्यावी. विट्टभटी कामगार यांच्याबरोबर फिरते घटक असणाऱ्या लोकांनाही लस घ्यावी. शासनाच्या या उपक्रमातून कोरोना हटाविण्यासाठी मोहित राबविली जात असून लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करत आहे.