Wednesday, March 29, 2023

राजकारण होऊनही शहरातील ‘इतक्या’ नागरिकांचे लसीकरण

- Advertisement -

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शहरात सुरु असून शहरातील ६ लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मात्र अजूनही ४५ हजार नागरिक हे दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शहरातील आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे, असे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद शहरात १८ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या लाखांच्या घरात गेली आहे. परिणामी ४ ऑगस्ट पर्यंत मनपाने ५ लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामधे ४ लाख २४ हजार १४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर १ लाख ७५ हजार ६०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेला ६ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करायला ८०० नागरिकांच्या लसीकरणाची गरज होती. त्यातच गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसिकरणामुळे १ हजार ९१२ नागरिकांचे लसीकरण झाल्याने महानरगापलिका हद्दीतील ६ लाख १ हजार ११६ नागरिक लसवंत झाले आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी दिली आहे.