औरंगाबादेत लसींचा ठणठणाट; लसीकरणासाठी नागरिकांची वणवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेकडून होणाऱ्या लसीचा तुटवडा चिंताजनक असून दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांची यादी आज एक लाखावर गेली आहे. बुधवारी ही संख्या 80 हजारावर होती. लसीचा तुटवडा कमी व्हावा आणि लस मिळावी यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे. लसीकरण केव्हा सुरू होईल आणि लस्सी पूर्ण प्रमाणात केव्हा मिळतील अद्याप सांगता येत नाही. महानगरपालिकेने राज्य सरकारला कोविशिल्ड पुरवण्याची मागणी केलेली असल्याचे महानगरपालिका अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

गुरुवारी कोविशिल्डच्या 7 हजार लसी मिळाल्या होत्या. त्यानुसार पहिल्या डोससाठी 39 केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर दुसऱ्या डोससाठी 34 केंद्रावर लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते. लस मिळणार असल्याचे समजताच नागरिकांनी केंद्रावर कुपन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे अवघ्या 4 तासातच ही लस संपली.‘आमच्याकडे 3500 कोवाक्सिन आहे. हे लसीकरण क्रांती चौक, राजनगर आणि अंबिकानगर (एमआयटी हॉस्पिटल) या तीन ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळेत सुरू राहील. परंतु कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे,’ असे डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.

Leave a Comment