CBI कडून वाधवान बंधुंना अटक, सातार्‍याहून विषेश वाहनाने मुंबईकडे रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वाधवान बंधुचा ताबा घेण्यासाठी पुणे येथील CBI ची टीम आज महाबळेश्वर मध्ये दाखल झाली आहे. सातारा पोलिसांच्या सहकार्याने वाधवान कुटुंबाला CBI ने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी सातार्‍याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. धीरज आणि कपिल वाढवान यांना CBI ने अटक केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पाचगणी येथील इन्स्टिट्युशनल काॅरन्टाईन नंतर वाधवान कुटुंबियांना सातारा जिल्हा प्रशासनाने वाधवान हाऊस मध्ये क्वारंटाइन केले होते. ३ मे नंतर पुढील कारवाई होईल असे बोलले जात होते. मात्र CBI च्या टीमने सातार्‍यात जाऊन वाधवान कुटुंबियांना आज ताब्यात घेतले.

तसेच ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज सौनिक यांचा अमित गुप्ता प्रिन्सिपल सेक्रेटरी होम (Special) यांच्याबद्दलचा इन्क्वायरी रिपोर्ट आज किंवा उद्या मिळणार असल्याचेची गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. दरम्यान, सातारा पोलिसांचे काही कर्मचारी सुरक्षेकरता CBI सोबत मुंबईपर्यत येणार आहेत. आता वाधवान यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment