वडूज | कलेढोण (ता. खटाव) येथील बोबडे मळा शिवारातील एका महिलेचा खून व महिलेच्या अंगावरचे सोन्या-चांदीचे चोरून नेल्याप्रकरणी सचिन मच्छिंद्र शिरतोडे (वय – 27 रा. कलेढोण ता. खटाव) यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
1 जून 2016 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलेढोण गावच्या हद्दीत बोबडेमळा नावचे शिवारात मयत नामे सौ. शकुंतला बबन कणसे (वय- 48 वर्षे, रा. कलेढोण, ता. खटाव) या आपल्या गोटयातील जनावरांना चारापाणी करुन जवळ असले मल्हारी नामदेव माळी यांच्या लिंबाच्या झाडाखाली सावलीत एकटया झोपल्या असताना आरोपी सचिन मच्छिंद्र शिरतोडे याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे वैरण तोडण्यासाठी ठेवलेल्या कु-हाडीने मयताचे उजवे गालावर कानाचे जवळ धारेकडून घाव घालून गंभीर जखमी करुन खून केला. मयत महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते.
त्याप्रमाणे सांगितल्याने गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.या खटल्यात वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस कलम 302 प्रमाणे जन्मठेप व 5 हजार रुपये दंड, तसेच कलम 397 प्रमाणे 7 वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे