मोठी बातमी! लोणावळ्याहून पाचगणीत आलेल्या ‘त्या’ २३ जणांना गृहखात्याच्या प्रधान सचिवांचेच पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या आहेत. मात्र अशातही येस बँक घोटाळ्यातील बागवान कुटुंबिय लोणावळ्याहून पाचगणीला पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मंत्रालयातील खास पत्राच्या सहाय्याने बागवान कुटुंब पाचगणीला पोहोचल्याची माहिती होती. मात्र आता हे पत्र दुसर्‍या तिसर्‍या कोणाचे नसून गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचेच असल्याचे समोर आले आहे.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सदर पत्र ट्विट करुन वागवान कुटुंबियांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार DHLF ग्रुपचे वागवान हे आपल्या कुटुंबासोबत आणि नोकरांसोबत पाच चारचाकी गाड्यांनी काल सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे आले. गृहखात्याच्या प्रधान सचिवांचे पत्र सोबत असल्याने त्यांना कोठेही अडवण्यात आले नाही. मात्र पाचगणीत आल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये हलवले. याची माहिती सर्वत्र पसरताच उच्चभ्रूंना जिल्हाबंदी नाही का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जाऊ लागला.

दरम्यान, वागवान कुटूंबियांना लोणावळ्याहून पाचगणीला जायची परवानगी कशी मिळाली याबाबत आपण चौकशी करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. सदर २३ जणांची प्रकृती स्थिर असून त्यातील कोणीही कोरोना बाधित नाही अशी माहिती आहे.

Leave a Comment