वैजापूर- गंगापूर रोडवर कार व ट्रॅव्हलचा भीषण अपघात; एक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळील शेताजवळ गट नं.198 दौलतराव शेळके यांच्या वस्तीजवळ कार व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारचालक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-वैजापूर रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास सवेरा कंपनीची ट्रॅव्हल बस (एमएच 20 ईजी 5577) ही वैजापूरच्या दिशेने जात असताना समोरुन येणारी कारची (एमएच 06 एडब्ल्यू 5561) समोरासमोर धडक झाली. यात कारचालक विलास दिनकर पुंड (वय 42, रा.वाळूज) यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अहेमद अली सय्यद यांना स्वामी विवेकानंद रुग्णवाहिकेतील चालक सागर शेजवळ यांनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गंगापुर येथे भर्ती केले.

याप्रकरणी पुढील तपास विरगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पंडूरे हे करीत आहेत.

Leave a Comment