Saturday, February 4, 2023

पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु

- Advertisement -

पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. सोबतीला एखादा मित्र असतोच. पण या संचारबंदीमुळे ही सगळी मजा बऱ्याच दिवसात पुणेकरांना अनुभवता आली नाही. पण आता किमान वैशालीच्या पदार्थांची चव पुणेकरांना नक्की घेता येणार आहे. कारण वैशाली पुन्हा सुरु झाले आहे.

काही दिवस मात्र आपल्याला सकाळी ८ ते सायंकाळी ६ एवढ्याच वेळात येथील पदार्थांचा लाभ मिळणार आहे. आणि काही मोजकेच पदार्थ ज्यामध्ये बटाटा वडा, व्हेज कटलेट, साबुदाणा वडा, उत्तपा यांचा समावेश आहे, यांचाच आस्वाद घेता येणार आहे. तसेच काही दिवस केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. वैशाली हॉटेल सुरु झाल्यावर इथल्या रसिक चाहत्यांनी गर्दीही केली मात्र परिस्थिती पाहता हॉटेल व्यवस्थापनाने आणि चाहत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मास्क व हॅण्डगल्व्ह्ज वापरून पुण्यातील या खवय्यांची सेवा सुरु ठेवली आहे.

- Advertisement -

गेल्या २ महिन्यांपासून पुण्यातील जवळपास सर्वच हॉटेल बंद आहेत. संचारबंदीचे नियम जसजसे शिथिल होत आहेत तसतसे हळूहळू काही व्यवसाय नव्याने सुरु होत आहेत, पण विषाणूचा धोका अद्याप पूर्णतः तळलेला नाही म्हणून सर्वानीच काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्याचे पालन वैशाली हॉटेल च्या व्यवस्थापनाकडून केले जात आहे. कोणत्याच प्रकारची गर्दी होऊ नये म्हणूनच पार्सल सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.