व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी ऑनलाईन भेटवस्तू मागवताय? मग जरा सावधान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येत आहे.  प्रेमी युगलांना आपल्या प्रिय व्यक्तीला आठवण म्हणून भेटवस्तू काय आणि कुठून घ्यावी असा प्रश्न पडला आहे. अशा वेळी अनेक जण घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडण्याच्या विचारात आहेत. मात्र, ऑनलाईन शॉपिंग करताना जरा जपून कारण राज्याच्या गृहमंत्रालयाने एक सावधानतेचा इशारा दिला आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी ऑनलाईन भेटवस्तू मागवत असाल तर त्यासाठी सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला फ्री गिफ्ट कूपन, गिफ्ट कार्ड आणि हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळं सायबर हल्लेखोरांच्या या प्रलोभनांना बळी पडू नका, असे राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाकडून  आवाहन करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस सायबर गुन्हयांचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. सायबर हल्लेखोर लोकांना अनेक प्रलोभन देत त्यांचा खिसा कापण्याच्या नेहमीच तयारीत असतात. तेव्हा अशा प्रलोभनांना बळी  न पडता सायबर हल्ल्यापासून सावध रहाणे गरजेचे आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment