हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फेब्रुवारी हा म्हणजेच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची तरुण आतुरतेने वाट पाहत असतात. फेब्रुवारी महिना म्हणजेच जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याचा महिना समजला जातो. तरुण वर्ग ते जोडपी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात. मुळात फक्त हा एकच दिवस प्रेम व्यक्त करण्याचा नसतो. फेब्रुवारीतील 7 ते 14 तारखेपर्यंतचा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरी करण्यात येतो. या आठवड्यात वेगवेगळे डेज साजरी करण्यात येतात. यावर्षी हे डेज कोणत्या दिवशी आले आहेत, जाणून घेऊयात.
Valentine’s Day Week ची पूर्ण लिस्ट
Rose Day (7 फेब्रुवारी) – या दिवशी जोडीदार आपल्या प्रियसीला किंवा प्रियसी आपल्या प्रियकराला प्रेम व्यक्त करत गुलाबाचे फुल देते. काहीजण मैत्रीच्या नात्याने देखील हे फुल देत असतात.
Propose Day (8 फेब्रुवारी) – प्रपोज डेच्या दिवशी एखाद्या आवडणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या जातात. अनेक नात्यांमध्ये वर्षा उलटून गेल्यानंतर प्रेम व्यक्त करणे जोडीदार विसरून जातात. त्यामुळे हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरी केला जातो.
Chocolate Day (9 फेब्रुवारी) – चॉकलेट लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडत असते. त्यामुळे चॉकलेट डे दिवशी तुम्ही तुमच्या आईपासून ते प्रियसीपर्यंत कोणालाही चॉकलेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता.
Teddy Day (10 फेब्रुवारी) – टेडी डे यादिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीला गोंडस टेडी देऊ शकता. तुम्ही हा टेडी दिल्यानंतर समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असेल.
Promise Day (11 फेब्रुवारी) – प्रेमाच्या नात्यांमध्ये वचने देणे ही खूप मोठी जबाबदारी असते. परंतु कालांतराने अनेकजण ही वचने विसरून जातात. त्यामुळेच प्रॉमिस डे दिवशी तुम्ही पुन्हा नवीन वचने देऊ शकता किंवा जुनी वचने पूर्ण करू शकता.
Hug Day (12 फेब्रुवारी) – दुःखात असणाऱ्या व्यक्तीला किंवा निराश असणाऱ्या जोडीदाराला एक मिठी मारली तरी त्याला आधार वाटतो. हग डे दिवशी तुम्ही हीच मिठी मारून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.
Kiss Day (13 फेब्रुवारी) – आपल्या जोडीदाराचा हळुवारपणे झालेला स्पर्श मनात शहारे फुलवणारा असतो. परंतु कालांतराने अनेकजण प्रेम व्यक्त करायला या स्पर्शाची जाणीव द्यायला विसरतात. किस डे दिवशी तुम्ही जोडीदाराचे चुंबन घेऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता.
Valentine’s Day (14 फेब्रुवारी) – सर्व दिवसांमध्ये व्हॅलेंटाईन डे हा सर्वात खास दिवस असतो. संपूर्ण वीक साजरी केल्यानंतर यादिवशी तुम्ही समोरील व्यक्तीविषयी प्रेम आदर व्यक्त करू शकता. तसेच आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला सांगत प्रपोज करू शकता. आपल्या जोडीदाराला फिरायला घेऊन जाऊ शकता.